कै.गं.भा.लक्ष्मीबाई सूर्यभान म्हसे यांचा उद्या दशक्रिया विधी

राहुरी वेब प्रतिनधी ,१८ ( शरद पाचारणे ):-राहुरी तालुक्यतील  कोंढवड येथील ज्येष्ठ नागरिक कै. लक्ष्मीबाई सूर्यभान म्हसे यांचे मंगळवार, दि. १५ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कोंढवड परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात जालिंदर सूर्यभान  म्हसे ,राहुरी कारखान्याचे माजी संचालक  उत्तमराव सूर्यभान  म्हसे,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख आण्णासाहेब सूर्यभान  म्हसे असे ३  मुले ,२ मुली , नातू शिवसेना (उ बा ठा) चे तालुका प्रमुख सचिन म्हसे  सह ३ नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने म्हसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कै. गं.भा. लक्ष्मीबाई सूर्यभान म्हसे यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. १९ जून २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता मुळा नदी  तिरी, कोंढवड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होईल. तर, तेरावा रविवार, दि. २२ जून २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.याप्रसंगी, रामयनाचार्य भागवताचार्य ह.भ.प. स्वामी अरुणनाथगिरी महाराज (मठाधिपती – श्री अडबंगनाथ संस्थान, श्रीक्षेत्र भामाठाण) यांचे प्रवचन सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे.कै. गं.भा.लक्ष्मीबाई सूर्यभान म्हसे यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो, हीच प्रार्थना. समस्त म्हसे पाटील परिवार, कोंढवड यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *