शिवांकुर  विद्यालयात  जागतिक योगा दिन उत्साहात साजरा 

राहुरी प्रतिनिधी,२१ (शरद पाचारणे )- 

शिवांकुर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. व्यायाम, प्राणायाम, सूर्य नमस्काराने मनुष्याचे शरीर निरोगी  व बुद्धी शांत राहते असे प्रतिपादन योगशिक्षिका मीना येवले यांनी केले.

विद्यालयात जागतिक योगा दिनानिमित्त योग शिक्षिका मीना येवले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात योगा, सूर्यनमस्कार, व्यायाम याचे महत्त्व सांगितले व योगाचे अनेक प्रकार व त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी देखील प्राणायाम, विविध आसने, सूर्यनमस्कार याचे प्रात्यक्षिक केले. संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांना योगा आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.

योगदिन साजरा करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार सचिव डॉ. प्रकाश पवार उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फाटक व आभार सुजाता तारडे यांनी केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबल, ज्योती शेळके, प्रियंका पांढरे, शितल फाटक, सुजाता तारडे, प्रिया लांबे, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, मोहिनी पेरणे, वर्षा कांबळे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, अनिता म्हसे, शिपाई उत्तम पवार, शारदा तमनर, लता कासवत, वाहतुक विभाग प्रमुख अशोक गाडे, सखाराम बाचकर, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहेर, नंदु गिरी, कैलास गडधे, चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *