राहुरी (ता. राहुरी) – राहुरी येथील कै. सखाराम लक्ष्मण बाचकर यांचे सोमवार, दिनांक १६ जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वडनेर, घोरपडवाडी आणि राहुरी परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तात्यासाहेब बाचकर व अमोल बाचकर असे दोन मुलगे, सुना, नातू, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. ते भार्गव ॲक्वा कल्चरचे सर्वेसर्वा तात्यासाहेब बाचकर यांचे वडील होते, तर ॲडव्होकेट रामदास बाचकर यांचे ते चुलते होते.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, दिनांक २५/०६/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता वडनेर (ता. राहुरी) येथे होईल. या निमित्ताने ह.भ.प. राहुल महाराज तिखुले (सरला बेट) यांचे सकाळी प्रवचन होईल.
तेराव्याचा विधी शनिवार, दिनांक २८/०६/२०२५ रोजी सकाळी १० वाजता राहुरी कॉलेज येथे होईल.
शोककुल परिवार:
समस्त बाचकर परिवार, नातेवाईक व आप्तेष्ट.