राहुरी वेब प्रतिनिधी,२१ (शरद पाचारणे): देवळाली प्रवरा येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. महायुती सरकारने देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस स्टेशन मंजूर केले आहे, यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे अशी येथील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती. राहुरी पोलीस ठाण्यावर असलेला कामाचा वाढता भार आणि देवळाली प्रवरा परिसरातील वाढती लोकसंख्या यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज होती.
महायुती सरकारने ही मागणी गांभीर्याने घेत देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे राहुरी पोलीस ठाण्याचा कामाचा ताण कमी होणार असून, देवळाली प्रवरा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता जलद आणि प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध होणार आहे.
या निर्णयामुळे देवळाली प्रवरा परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल आणि कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आभार मानले आहेत.