राहुरी, २१ जुलै(शरद पाचारणे ):- राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबना प्रकरणाचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवण्यात यावा, या मागणीला राष्ट्रीय श्रीराम संघ,सकल हिंदू समाज ,मळगंगा तरुण मंडळ ,बुवाशिंद बाबा मंडळ ,जय अंबिका तरुण मित्र मंडळ यांनी आज पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतचे वेगवेगळे निवेदन दिले.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यापूर्वीच ही मागणी केली होती. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी घडलेल्या या घटनेला चार महिन्यांहून अधिक काळ उलटला असूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. या घटनेनंतर सकल हिंदू समाजाने दोन दिवस शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीन दिवसांचे आमरण उपोषण केले होते, त्यावेळी पोलीस प्रशासनाने लवकरच आरोपींना शोधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आरोपी मोकाट फिरत असल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेली मागणी रास्त असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेचा तपास संतोष खाडे यांच्याकडे देण्यात यावा, याला राष्ट्रीय श्रीराम संघ,सकल हिंदू समाज ,मळगंगा तरुण मंडळ ,बुवाशिंद बाबा मंडळ ,जय अंबिका तरुण मित्र मंडळ
यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे वेगवेगळे निवेदन देण्यात आलेत . येत्या २६ जुलै रोजी प्राजक्त तनपुरे यांनी पुकारलेल्या आंदोलनात सकल हिंदू समाज ,राष्ट्रीय श्रीराम संघ,मळगंगा तरुण मंडळ ,बुवाशिंद बाबा मंडळ ,जय अंबिका तरुण मित्र मंडळ त्यांच्यासोबत सक्रियपणे सहभागी होईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. चार महिने उलटूनही आरोपींचा शोध लागत नसल्यास सकल हिंदू समाज शांत बसणार नाही, त्यामुळे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सकल हिंदू समाज, राष्ट्रीय श्रीराम संघ,मळगंगा तरुण मंडळ ,बुवाशिंद बाबा मंडळ ,जय अंबिका तरुण मित्र मंडळचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.