पंक्चर झालेल्या आयशर मधून १, ३४,४३० रुपयाच्या ऑईलची चोरी

राहुरी वेब प्रतिनिधी,( शरद पाचारणे ) :- पंक्चर झालेल्या आयशर मधून १ लाख ३४ हजार ४३० रुपयाचे रुपये किमतीचे ऑईलचे बॉक्स अज्ञात भामट्याने लंपास केल्याचा प्रकार राहुरी हद्दीत नगर – मनमाड रोड वर 15 जून 2025 रोजी पहाटे 03:00 ते सकाळी 07:30 वाजताच्या सुमारास कोल्हार खु येथील  हॉटेल साई संगम जवळील KGN पंचरवाला दुकान समोर घडली.
राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात 1,34,430/- रुपये किमतीच्या ऑईल बॉक्सच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत आयशर चालक विजय प्रशांत गायकवाड (वय 25, व्यवसाय: ड्रायव्हर, रा. अष्टे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी या प्रकरणी लेखी फिर्याद दिली आहे . गायकवाड यांच्या मालकीची आयशर कंपनीची गाडी क्र. MH-13 DQ-4986 14 जून 2025 रोजी वापी, गुजरात येथून ऑईल बॉक्स घेऊन हैदराबाद येथे जात होती .
गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 जून 2025 रोजी पहाटे 03:00 वाजताच्या सुमारास शिर्डी ते अहिल्यानगर हायवे रोडवर कोल्हार खु.  गावाजवळ हॉटेल साई संगम समोर त्यांच्या गाडीचा पाठीमागील टायर पंक्चर झाला. त्याठिकाणी पंचरचे दुकान बंद असल्याने, त्यांनी गाडी तिथे लावली आणि गाडीतच थांबले सकाळी 07:30 वाजता दुकान उघडल्यानंतर ते गाडीचे टायर काढण्यासाठी खाली आले असता, त्यांना गाडीची ताडपत्री फाडलेली दिसली आणि गाडीतील काही ऑईलचे बॉक्स चोरी झाल्याचे निदर्शनास आले . अज्ञात चोरट्यांने गाडीची ताडपत्री फाडून ऑईलचे बॉक्स चोरल्याची त्यांच्या लक्षात आले  .
चोरीस गेलेल्या मालामध्ये ऑईलचे एकूण 15  बॉक्स होते, ज्यांची अंदाजित किंमत प्रत्येकी 8962/- रुपये दराने 1,34,430/- रुपये आहे .
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *