शेतकरी हितासाठी शिवसेना शेतकरी विकास मंडळाच्या पाठीशी. – बाबुशेठ टायरवाले

राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे )–  दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ वाजता राहुरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शिवसेना दक्षिण नगर जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.या प्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे,शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र लोंढे,ओबेसी सेना जिल्हा प्रमुख प्रदीप भोंडे,मा.जि.सदस्य धनंजय गाडे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले कि,राहुरी येथील डॉ.बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे पा. यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे सभासद एकत्रित येत आहेत.सर्वसामान्य सभासदांना उमेदवारी देवून प्रस्तापित कारखानदार व घराणेशाही चालवणाऱ्या कुटुंबांच्या विरोधात विस्थापितांचे लेकर राहुरी कारखाना वाचवायला निघाले आहेत.राजूभाऊ शेटे पा.यांनी शेतकरी हितासाठी निवडणूक हातात घेतली आहे,त्यांच्या पाठीमागे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकतीने उभे आहेत.राजूभाऊ शेटे हे सर्वसामान्य गोरगरीब  जनतेच्या न्याय हक्कासाठी मदतीसाठी सदैव तत्पर असतात हे राहुरी तालुक्यातील जनतेला माहित आहे.निस्वार्थी पणे काम करणारे व्यक्तिमत्व राहुरी येथील शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना वाचविण्यासाठी पुढे आले आहेत.त्यामुळे  शेतकरी हितासाठी शिवसेना पक्ष राजूभाऊ शेटे पा.यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या पाठीशी भक्कम पणे उभे आहेत व पूर्ण ताकतीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मालमत्ता शेतकऱ्यांच्या हातात मिळवून द्यायची आहे  असे श्री.टायरवाले म्हणाले.

 या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख जयवंत पवार,उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर टेकाळे,३२ गाव उप ता.उपप्रमुख पै.सुनील खपके,संघटक महेंद्र उगले,सुभाष जुंदरे,अँड.निलेश धुमाळ,प्रशांत खालेकर,दादासाहेब खाडे,बापूसाहेब काळे,अनिल आढाव,दिपक जाधव,वांबोरी शहर प्रमुख अंकुश पवार,महेंद्र शेळके,सारंगधर साठे,वैभव लांबे,नारायण लांबे,सतीष माळवदे,संदीप काकड,बाळासाहेब जाधव,विजय तोडमल,बाळासाहेब खाडे,अविनाश क्षीरसागर आदी सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *