राहुरी वेब प्रतिनिधी, १५ जुलै (शरद पाचारणे):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझम (पत्रकारिता) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात राहुरी आणि श्रीरामपूरमधून नारायण चोरमले, तर नेवासेमधून किरण जाधव हे उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी ही परीक्षा संगमनेरच्या मालपाणी कॉलेज अंतर्गत डॉ. संतोष खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होती.
उत्तीर्ण झालेले नारायण चोरमले हे ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असून, ते रुद्रा न्यूज डिजिटल मीडियाचे संपादक आहेत. रुद्रा न्यूजने आजवर ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम केले आहे. याच कामाला जोडून चोरमले यांनी पत्रकारिता क्षेत्रातील ही पदवी संपादन करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून आणि ग्रामीण भागातून विशेष कौतुक होत आहे.