अहिल्यानगर वेब टिम,१५ जुलै : बहुचर्चित सीताराम सारडा विद्यालयातील खून प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वसिम हमीद शेख (वय ४०, रा. सर्जेपुरा, कैलारु कॅम्प, ता. जि. अहिल्यानगर ) याला तोफखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६६४/२०२५, बी.एन.एस. कलम १०३ (१) अन्वये २५ जून २०२५ रोजी रात्री ८:१८ वाजता या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून वसिम शेख फरार होता आणि पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
आज, १५ जुलै २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी वसिम हमीद शेख मुकुंदनगर परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी आणि इतर पोलीस अंमलदार तात्काळ मुकुंदनगर परिसरात रवाना झाले. आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपले नाव वसिम हमीद शेख असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, श्री. अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे (चार्ज तोफखाना पो.स्टे, अहमदनगर), सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश वारुळे, तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ. सुनील चव्हाण, अब्दुलकादर इनामदार, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, पो.कॉ. सुमित गवळी, अविनाश बर्डे, पो.कॉ. सतीश त्रिभुवन, पो.कॉ. सुजय हिवाळे, पो.कॉ. कपिल गायकवाड, पो.कॉ. पाखरे भागवत बांगर, मपो.ना. जिजा खुडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.