राहुरी वेब प्रतिनिधी,१९ ( शरद पाचारणे ):- मा.खा.श्री. प्रसाद बाबुराव तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिलेनियम फाऊंडेशनच्या सौजन्याने आणि श्री विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय, श्रीशिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री विवेकानंद नर्सिंग होमचे, आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय, श्री शिवाजीनगर (राहुरी कारखाना), ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
या शिबिरात जपानीज टेक्नॉलॉजी मशीनच्या साहाय्याने फक्त १००/- रुपयांमध्ये संपूर्ण शरीराची तपासणी (फुल बॉडी चेकअप) करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तपासणीनंतर तात्काळ १३१ पानांचा ई-मेडिकल रिपोर्ट देखील प्रदान करण्यात येणार आहे.
या शिबिरात खालील प्रमुख व्याधी आणि विकारांवर तपासणी व तज्ञांचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध असेल:
जीवनशैलीशी संबंधित आजार:मधुमेह/डायबिटीज/शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉईड, ताण-तणाव, हृदयविकार/रक्तदाब, वजन वाढवा/घटवा.
हाडांचे आणि सांध्यांचे विकार: सांधेदुखी, गुडघेदुखी, हाडांचे विकार, हाडांचे फॅक्चर, मणक्याचे विकार.
श्वसन आणि ॲलर्जी:दमा/अस्थमा, श्वसनाचे विकार, ॲलर्जी, निमोनिया.
पोटाचे आणि पचनाचे विकार: पाईल्स, अल्सर, पोटाचे विकार, ऍसिडीटी/पित्त/अपचन/गॅसेस, मुतखडा.
त्वचा आणि केस:सोरायसिस/त्वचा विकार, पिंपल्स/मुरुम/चेहऱ्यावरील पुटकुळ्या, केसांचे आरोग्य (केस गळती/केस कोंडा).
इतर महत्त्वाच्या तपासण्या: ट्युमर, चिकनगुनिया, डेंग्यू, पॅरालिसिस, डोळ्यांचे विकार, फिट येणे, व्हेरिकोज, कॅन्सर प्रतिबंधक उपाय, विस्मरण विकार, गर्भधारणा काळातील काळजी/आफ्टर प्रेग्नेंसी खबरदारी आणि उपाय, उंची वाढवणे, स्नायू दुखी, हिमोग्लोबिन/ॲनिमिया, कुष्ठरोग, लहान मुलांचे आरोग्य वाढ व रोग प्रतिकारशक्ती, पुरुषांचे आरोग्य व रोग प्रतिकारक शक्ती, दंतविकार आणि दातांचे आरोग्य, युरीन इन्फेक्शन/लघवीचे विकार, महिला रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे आणि पी.सी.ओ.डी. (मासिकपाळी)/ओटी पोटाचे दुखणे, रक्त शुद्धीकरण, थंडी ताप, ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढवणे, मेन्स सेक्सुअल प्रॉब्लेम/स्टॅमिना (पुरुष), इन्सोम्निया.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे धातूचे दागिने घालून येऊ नये. सोबत आधारकार्ड आणि सध्याच्या व्याधी-विकारांवरील जुने रिपोर्ट आणल्यास तपासणीत प्राधान्य दिले जाईल.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, श्रीशिवाजीनगरचे अध्यक्ष मा.श्री. अरूणसाहेब बाबुराव तनपुरे, उपाध्यक्ष मा.श्री. भारत नानासाहेब वारूळे, खजिनदार मा.श्री. भास्कर जगन्नाथ ढोकणे आणि सर्व विश्वस्त मंडळ कार्यरत आहेत. तसेच आयुर्वेद महाविद्यालय, श्रीशिवाजीनगरचे प्राचार्य व उप-प्राचार्य यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.
पूर्व नांव नोंदणीसाठी संपर्क: 02426-251659, 9860376534, 9960983305.
नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.